मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) मधील फरक समजून घेणे
Piles

मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) मधील फरक समजून घेणे

मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) बद्दल सर्व काही: तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत

आजच्या जगात, अनेक लोक मूळव्याध (पाइल्स) , फिशर आणि भगंदर (फिस्टुला) यासारख्या गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) विकारांमुळे काही न बोलता त्रास सहन करतात. अनेकवेळा नक्की काय झाले आहे हे ओळखण्यात देखील त्यांच्याकडुन चूक होऊ शकते. या विकारांमध्ये काही लक्षणे एक सारखीच असतात, परंतु त्या लक्षणांची कारणे, प्रभाव आणि उपचार पद्धतींमध्ये मूलभूत फरक असतो. भारतात गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) आजार सार्वत्रिक असून, लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम करणारे आहेत. मध्य भारतात केलेल्या एका स्टडीमध्ये (अभ्यासात) असे आढळून आले आहे की गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) आजाराच्या 35.59% प्रकरणांमध्ये मूळव्याध (हेमोऱ्होइड) आढळून आले आहे, तर फिशर-इन-एनो हे 33.05% आहे.

सर्वांगीण आरोग्यामध्ये गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) आरोग्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, तरीही मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) यासारख्या कंडिशन्स विषयी अनेकवेळा गैरसमज करून घेतला जातो. हे आजार गुदद्वारासंबंधी (एनल) आणि गुदाशयसंबंधी (रेक्टल) भागावर परिणाम करतात, ज्यामुळे अस्वस्थता, वेदना आणि इतर लक्षणे उद्भवतात ज्यामुळे आयुष्याच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

हिलिंग हॅंड्स (Healing Hands) येथे, आम्ही ह्या आजारांवर उपचार आणि त्यांना मॅनेज करण्यासाठी कार्यक्षम, प्लांट-बेस्ड सोल्यूशन ऑफर करताना या कंडिशन विषयी स्पष्ट माहिती प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या ब्लॉगमध्ये आम्ही मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) तसेच त्यांच्या सध्याच्या उपचार पर्यायांमधील फरकांबद्दल चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला आराम मिळवून देण्यासाठी आणि बरे करण्यासाठी चे उपचार पर्याय सादर करणार आहोत.


मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) समजून घेणे

चला आपण या प्रत्येक गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) कंडिशनचा झटपट आढावा घेऊया:

1. मूळव्याध (पाइल्स/हेमोऱ्होइड्स) म्हणजे काय?

 

मूळव्याध (पाइल्स) म्हणजे गुदमार्ग किंवा एनस मधील सुजलेल्या (स्वोलन/ इंफ्लेम्ड ) शिरा (व्हेन्स). त्यांना इंटर्नल (रेक्टममध्ये) किंवा एक्सटर्नल (गुदमार्गच्या आसपास) असे वर्गीकरण केले जाते.

  • मूळव्याधाची कारणे: जुनाट बद्धकोष्ठता (क्रॉनिक काँस्टीपेशन), शौचाच्या दरम्यान जोर लावणे (स्ट्रेनिंग), दीर्घकाळ बसणे, गर्भधारणा, लठ्ठपणा आणि कमी फायबर असलेला आहार.
  • मूळव्याधाची लक्षणे: शौचाच्या दरम्यान रक्तस्राव, गुदद्वाराजवळ सूज किंवा खाज सुटणे आणि वेदना.
  • मूळव्याधाचे (पाइल्स) प्रकार: गुदद्वाराच्या कालव्यातील एक प्रमुख संरचनात्मक सीमा असलेल्या डेंटेट रेषेच्या वर आणि खाली असलेल्या स्थानाच्या अनुसार मूळव्याधांना बाह्य (एक्स्टर्नल) आणि अंतर्गत (इंटर्नल) मूळव्याधांमध्ये वर्गीकृत केले जाते. अंतर्गत (इंटर्नल) मूळव्याध सामान्यतः दिसत नाहीत आणि त्यामुळे रक्तस्त्राव (ब्लीडिंग) होऊ शकतो, तर बाह्य (एक्स्टर्नल) मूळव्याध (पाइल्स) एनस भोवती लंप सारखे जाणवू शकतात आणि त्यामुळे वेदना, सूज आणि अस्वस्थता येऊ शकते.
  • मूळव्याधाचे कॉम्प्लीकेशन्स: गंभीर केसेसमध्ये प्रोलॅप्स्ड किंवा थ्रोम्बोज्ड मूळव्याध (पाइल्स) होऊ शकते ज्यामुळे सर्जरीची (मेडिकल इंटरव्हेंशनची) आवश्यकता असू शकते.

मूळव्याधाला (हेमोरॉइड्स) चार ग्रेडमध्ये वर्गीकृत केले जाते:

  • ग्रेड I: यामध्ये मूळव्याध (हेमोरॉइड्स) गुदद्वारामध्ये (एनल कॅनल) राहते आणि बाहेर (प्रोलॅप्स) येत नाही. त्यामुळे काहीवेळा रक्तस्त्राव (ऑकेजनल ब्लीडिंग) होऊ शकतो परंतु तो बाहेरून दिसत नसतो.
  • ग्रेड II: शौचाच्या दरम्यान मूळव्याध (हेमोरॉइड्स) बाहेर येतात आणि आपोआप आत मध्ये जातात, हातानी ढकलावे लागत नाहीत, कधीतरी रक्तस्त्राव होऊ शकतो.
  • ग्रेड III: यामध्ये मूळव्याध (हेमोरॉइड्स) शौचाच्या (बॉवेल मुव्हमेंट) किंवा शारीरिक हालचाली दरम्यान बाहेर पडते आणि त्याला त्याच्या मूळ जागी परत नेण्यासाठी त्याला स्वतःहून (मॅन्युअली) मागे ढकलण्याची गरज असते, आणि ते ब्लीड होऊ शकतात.
  • ग्रेड IV: यामध्ये मूळव्याध (हेमोरॉइड्स) कायमस्वरुपी प्रोलॅप्स्ड असतात आणि गुदद्वारात (एनल) कॅनालमध्ये परत ढकलले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तीव्र अस्वस्थता, रक्तस्त्राव (ब्लिडिंग) आणि थ्रोम्बोसिससारखी संभाव्य परिस्थिती उद्भवू शकते.

2. फिशर म्हणजे काय?

 

  • फिशर म्हणजे गुदद्वाराच्या (एनस) नाजुक आणि पातळ लायनिंग मध्ये असलेली लहान भेग किंवा कट (टेअर). हा कट सहसा शौचाच्या (बॉवेल मुव्हमेंट) वेळी होणाऱ्या त्रासामूळे उद्भवतो.
  • फिशरची लक्षणे: शौचाच्या दरम्यान आणि त्यानंतर तीव्र वेदना,गुदद्वाराच्या लायनिंग मध्ये स्पष्टपणे दिसणारा कट (व्हिजिबल टेअर), रक्तस्त्राव आणि गुदद्वाराच्या स्नायूमध्ये (एनल स्फिंक्टर) कधीकधी वेदनादायक कळा (ऑकेजनल स्पॅजम्स) येतात.
  • फिशरचे प्रकार: एक्युट फिशरची लक्षणे 6 आठवड्यांपेक्षा कमी काळ टिकतात, तर जेव्हा लक्षणे 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतात तेव्हा त्या फिशरचे वर्गीकरण क्रॉनिक फिशर (जुनाट फिशर) असे केले जाते.
  • फिशरचे कॉम्प्लीकेशन्स: क्रॉनिक फिशरच्या कट जवळ मांसल भाग वाढणे.

3. भगंदर (फिस्टुला) म्हणजे काय?

 

गुदद्वारात एनल फिस्टुला हे एक एबनॉर्मल इन्फेक्टेड टनल (असामान्य संक्रमित मार्ग) सारखे कनेक्शन आहे जे गुदद्वार आणि आजूबाजूच्या त्वचेमध्ये विकसित होते. हे सहसा गुदद्वाराच्या ग्लॅंड (ग्रंथी) मधील फोड योग्यरित्या बरा न झाल्यानंतर तयार होते.

  • भगंदर (फिस्टुला)ची कारणे: क्रॉनीक इन्फेक्शन (जुनाट इन्फेक्शन), क्रोहन्स डिसीज, ट्यूबरक्युलॉसिस (क्षयरोग) किंवा गुदद्वारामधील फोड(एनल) होण्याची जुनी तक्रार असणे.
  • भगंदर (फिस्टुला) ची लक्षणे: सतत वेदना, सूज (स्वेलिंग), पू तयार होणे आणि स्त्राव होणे (पस डिस्चार्ज), जळजळ (बर्निंग) आणि काही तीव्र (सिव्हीअर) केसेसमध्ये ताप येणे.
  • भगंदरचे (फिस्टुला)च्या कॉम्प्लीकेशन्स: योग्य वेळी उपचार न घेतल्यास, भगंदर (फिस्टुला)मुळे सिस्टमिक इन्फेक्शन्स (व्यापक संसर्ग) आणि वारंवार येणारे फोडे (रिकरींग एब्सेसेस्) होऊ शकतात.

भगंदर (फिस्टुला) चे खालील प्रमाणे काही प्रकार आहेत:

  • इंटरस्फिंक्टेरिक भगंदर (फिस्टुला): हा गुदद्वारासंबंधी भगंदर (एनल फिस्टुला) चा सर्वात कॉमन प्रकार आहे. हा इंटर्नल आणि एक्सटर्नल गुदद्वाराच्या एनल स्फिंक्टर मध्ये (वर्तुळाकार स्नायूमध्ये) उद्भवतो आणि गुदद्वारासंबंधी (एनल) कॅनलच्या त्वचेसोबत कनेक्ट करतो.
  • ट्रान्सस्फिंक्टेरिक भगंदर (फिस्टुला): हा प्रकार इंटर्नल आणि एक्सटर्नल दोन्ही गुदद्वारासंबंधी (एनल) स्फिंक्टर्समधून (वाढतो) एक्सटेंड होतो. हा अधिक जटिल (कॉम्प्लेक्स) असतो आणि त्यात अनेकवेळा जास्त लांब ट्रॅकचा समावेश असतो.
  • सुप्रास्फिंक्टेरिक भगंदर (फिस्टुला): हा भगंदर (फिस्टुला)एनल स्फिंक्टरच्या वरून जातो आणि यामध्ये गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) रिंगच्या वरचे टिश्यू इन्व्हॉल्व्ह करतो. हा उपचार करण्यास कठीण असतो आणि सर्जरी आवश्यक असू शकते.
  • एक्स्ट्रास्फिंक्टेरिक भगंदर (फिस्टुला): एक्स्ट्रास्फिंक्टेरिक भगंदर (फिस्टुला) गुदद्वारासंबंधी (एनल) स्फिंक्टरच्या बाहेर पसरतो आणि त्यात पेल्विक ऑर्गन्सचा (ओटीपोटातील अवयवांचा) समावेश असू शकतो.
  • फिमेल भगंदर (फिस्टुला): फिमेल भगंदर (फिस्टुला) हे असे एबनॉर्मल कनेक्शन असतात जे व्हजायना (योनी), ब्लॅडर (मूत्राशय) किंवा रेक्टम (गुदाशय) यांसारख्या रिप्रॉडक्टीव्ह ऑर्गन्सला (पुनरुत्पादनासंबंधी अवयवांना) प्रभावित करतात.

मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) मधील तुलना

जरी मूळव्याध (पाइल्स), गुदद्वारासंबंधी फिशर (एनल फिशर) आणि गुदद्वारासंबंधी भगंदर/ भगंदर (एनल फिस्टुला) या वेगवेगळ्या कंडिशन्स असल्या तरी, त्यांच्यामध्ये एक कॉमन लिंक आहे: गुदद्वारासंबंधी/एनल क्षेत्रावर होणारा त्यांचा परिणाम, बहुतेकदा जुनाट बद्धकोष्ठता (क्रॉनीक काँस्टीपेशन) आणि शौचाच्या दरम्यान (बॉवेल मुव्हमेंट) ताण (स्ट्रेन) यामुळे वाढतो. खालील टेबल या तीन्ही कंडिशन्समधील प्रमुख फरक अधोरेखित (हायलाइट) करते:

वैशिष्ट्ये मूळव्याध (पाइल्स) गफिशर भगंदर (फिस्टुला)
कारणे गुदद्वारासंबंधी (एनल) कॅनलमधील सुजलेल्या शिरा (स्वोलन वेन्स) गुदद्वारासंबंधी (एनल) लाइनिंगमधील कट किंवा भेग गुदद्वारासंबंधी (एनल) कॅनल आणि त्याच्या सभोवतालच्या स्किनमधील ऍबनॉर्मल कनेक्शन (असामान्य संक्रमित कनेक्शन)
लक्षणे सूज (स्वेलिंग), इचिंग किंवा खाज, वेदना, गुदद्वाराच्या (एनसच्या) भोवताली रक्तस्त्राव तीव्र वेदना, रक्तस्त्राव, खासकरुन शौचाच्या (बॉवेल मुव्हमेंटच्या) दरम्यान सतत पू तयार होणे आणि स्त्राव होणे (पर्सिस्टेंट ड्रेनेज), वेदना, वारंवार होणारे संसर्ग (रिकरंट इंफेक्शन)
स्थान (लोकेशन) रेक्टल वेन्समध्ये (इंटर्नल किंवा एक्स्टर्नल) गुदद्वारासंबंधी (एनल) कॅनल लाइनिंगमध्ये गुदद्वारासंबंधी (एनल) कॅनलच्या भोवतालच्या स्किनमध्ये
उपचार पर्याय (ट्रिटमेंट ऑपशन्स) पपाइलोकिट कंप्लीट पाइल्स ट्रिटमेंट किट (PiloKit Complete Piles Treatment Kit) मेडिकल ट्रिटमेंट, लेजर सर्जरी, स्टेपलर सर्जरी फफिशरकिट कंप्लीट फिशर ट्रिटमेंट किट (FissureKit Complete Fissure Treatment Kit) मेडिकल ट्रिटमेंट, सर्जरी (LIS), फिस्टुलाकिट पोस्ट-सर्जरी एनल फिस्टुला केअर किट (FistulaKit Post-Surgery Anal Fistula Care Kit) पोस्ट सर्जरी हिलिंगसाठी किंवा सर्जरीला उशीर असेल तर फिस्टुलोटोमी, DLPL
ससामान्य धोका असलेले घटक (कॉमन रिस्क फॅक्टर्स) बद्धकोष्ठता (काँस्टीपेशन), गरोदारपणा (प्रेग्नंसी), लठ्ठपणा (ओबेसिटी) बद्धकोष्ठता (काँस्टीपेशन), अतिसार (डायरीया), त्रासामूळे झालेली जखम (ट्रॉमा) इन्फेक्शन्स, क्रोहन्स डिसीज, गुदद्वारामध्ये वारंवार फोडे
तीव्रता (सिव्हिअरिटी) माइल्ड ते सिव्हिअर वेगवेगळी असते एक्युट ते सिव्हिअर क्दीर्घकालीन (क्रॉनीक), भगंदर (फिस्टुला) सर्जरीची आवश्यकता असते

 

या कंडिशन्समध्ये समानता असली तरी, त्यांची कारणे, लक्षणे आणि उपचार पद्धतींमध्ये वेगळेपणा आहे. मूळव्याध (पाइल्स) प्रामुख्याने रक्तवहिन्यांसंबंधी समस्या (व्हॅस्क्यूलर इश्यू) आहे, एनल फिशर/फिशर गुदद्वाराला वारंवार होणाऱ्या जखमेमुळे (मेकॅनिकल ट्रॉमामुळे) होते आणि गुदद्वारासंबंधी (एनल) भगंदर (एनल फिस्टुला) बहुतेकदा होणाऱ्या इन्फेक्शनचा परिणाम असतो.

हिलिंग हँड्स (Healing hands) द्वारे उपचाराकरिता उपाय

हिलिंग हँड्स (Healing hands) येथे, आम्ही अशी औषधे आणि किट्स तयार केली आहेत, जी या कंडिशन्सना त्यांच्या मूळापासून बरे करतात. नैसर्गिक वनस्पती-आधारित (प्लांट- बेस्ड) घटकांपासून तयार केलेले आमचे उपाय आराम देतात, जखम भरून येण्याकरिता प्रोत्साहन देतात आणि या कंडिशन्सची पुनरावृत्ती रोखतात.

1. पाइलोकिट (PiloKit): कंप्लीट पाइल्स ट्रिटमेंट किट

 

मूळव्याधा (पाइल्स) वरिल उपचारांमध्ये मेडिसीन-फर्स्ट अप्रोच पासून ते एडव्हांसस्ड मेडिकल प्रोसिजरचा समावेश होतो. सुरुवातीला ही औषधे वेदना, सूज (स्वेलिंग) आणि अस्वस्थता यासारखी लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. अनेकवेळा लक्षणे कमी करण्यासाठी आणि मूळव्याधाच्या मॅनेजमेंटसाठी पाइलोकिट कंप्लीट पाइल्स ट्रिटमेंट किट PiloKit Complete Piles Treatment Kit ची शिफारस केली जाते. प्रत्येक पाइलोकिटमध्ये (PiloKit) पुढील गोष्टींचा समावेश होतो:

  • पाइलोस्प्रे (PiloSpray): भारतातील पहिला वेदना, इचिंग आणि सूज (स्वेलिंग) कमी करण्यासाठी बाह्य वापरासाठी पेटंट मिळालेला आणि आण्विकदृष्ट्या प्रमाणित (मॉलेक्युलरली व्हॅलिडेट) केलेला प्लांट-बेस्ड पाइल्स स्प्रे.
  • पाइलोटॅब (PiloTab): वेदना, रक्तस्त्राव आणि जळजळ वर नियंत्रणासाठी आण्विकदृष्ट्या प्रमाणित (मॉलेक्युलरली व्हॅलीडेटेड) आणि अंतर्गत उपचाराकरिता पेटंट मिळालेल्या प्लांट-बेस्ड पाइल्स टॅब्लेट्स.
  • काँस्टीटॅब (ConsteTab): बद्धकोष्ठता (काँस्टीपेशन) कमी करण्यासाठी पेटंट मिळालेल्या लॅक्सॅटीव्ह टॅब्लेट्स, ज्या शौचाच्या (बॉवेल मुव्हमेंट) दरम्यान होणारा ताण (स्ट्रेन) कमी करतात.

पाइलोकिट(PiloKit) कसे वापरावे?

पाइलोस्प्रे (PiloSpray):

1. वापरण्यापूर्वी कॅन चांगला हलवा.

2. 5-8 सेमी अंतरावरून 2-4 सेकंदांसाठी प्रभावित मूळव्याध (पाइल्स)  मास किंवा गुदद्वारासंबंधी (एनल) रिजनच्या भागात स्प्रे करा.

3. मूळव्याधच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार, शक्यतो शौचास जाण्यापूर्वी (बॉवेल मुवहमेन्टपूर्वी) आणि नंतर आणि झोपेच्या वेळी असे दिवसातून 2-3 वेळा किंवा गरजेनुसार लावा.

वापराच्या पद्धती:

खालीलपैकी कोणत्याही स्थितीमध्ये गुदद्वारासंबंधी (एनल) क्षेत्रातील प्रभावित भागावर बाहेरून स्प्रे करा:

  • स्क्वॅाटिंग: (बटक) नितंब पसरवा आणि स्प्रे करा.
  • उभे राहून: एका पायावर उभे राहा, दुसरा पाय आधार घेउन उचला, बटक पसरवा आणि स्प्रे करा.
  • आडवे झोपून: तुमच्या कुशीवर झोपा, एक पाय वर करा, बटक पसरवा आणि स्प्रे करा.

पपाइलोटॅब (PiloTab) टॅब्लेट्स:

  • डोस: जेवणानंतर 1 गोळी पाण्यासोबत घ्या, सकाळी एकदा आणि रात्री एकदा.

ककाँस्टीटॅब (ConsteTab) टॅब्लेट्स:

  • डोस: कॉंस्टीपेशनच्या तीव्रतेनुसार, रात्रीच्या जेवणानंतर 1 किंवा 2 गोळ्या पाण्यासोबत घ्या.

पपाइलोकिट (PiloKit) कोर्स:

चांगल्या परिणामांसाठी 30 दिवसांचा कोर्स करण्याचा सल्ला दिला जातो. मूळव्याधच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार, पाइलोकिट (PiloKit) कोर्स तीन महिन्यांपर्यंत रिपीट करता येतो. मूळव्याधच्या ट्रीटमेंटसाठी अनेक नामवंत भारतीय प्रॉक्टोलॉजिस्ट पाइलोकिट (PiloKit) रेकमेंड करतात आणि पाइल्स टु स्माइल्स पर्यंतच्या प्रवासात लाखो रुग्णांनी त्यावर विश्वास ठेवला आहे. औषधांव्यतिरिक्त, आहारातील बदल जसे की फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे, पुरेसे हायड्रेशन राखणे आणि नियमित व्यायाम हे मूळव्याध (पाइल्स) मॅनेजमेंट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

2. फिशरकिट (Fissurekit): कंप्लीट फिशर ट्रिटमेंट किट

 

प्रभावी फिशर उपचार बरे होण्यास प्रोत्साहन देण्यावर आणि पुनरावृत्ती रोखण्यावर लक्ष केंद्रित करतात. आजाराच्या सुरुवातीला, गुदद्वारासंबंधी (एनल) फिशर उपचार बरे होण्यास प्रोत्साहन देण्यावर आणि गुदद्वारासंबंधी (एनल) फिशर पुनरावृत्ती रोखण्यावर लक्ष केंद्रित करतात.

जलद रिकव्हरी आणि लक्षणांपासून रिलीफ मिळवण्यासाठी अनेकदा मेडिसीन-फर्स्ट अप्रोच सुचवला जातो. फिशरकिट कंप्लीट फिशर ट्रिटमेंट किट, (FissureKit Complete Fissure Treatment Kit) भारतातील पहिले पेटंट मिळालेले प्लांट-बेस्ड ट्रिटमेंट किट आहे, जे फिशरचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी एक होलीस्टीक उपाय ऑफर करते. हे काँप्रिहेन्सीव्ह केअरसाठी चार पेटंट औषधांची ताकद एकत्र करते.:

  • पाइलोस्प्रे (PiloSpray): वेदनादायक फिशर कटसाठी पेटंट मिळालेले आणि प्लांट-बेस्ड एनहान्स्ड बाह्य उपचार, ज्यामुळे जलद आराम मिळतो.
  • ऍनोऍक क्रीम: वेगवेगळ्या प्रकारचे तेल आणि भस्म एकत्र करून बनवलेले हे पेटंटेड क्रीम बाह्य उपचारासाठी वापरले जाते आणि यामुळे जखम लवकर भरून येण्यात मदत होते.
  • पाइलोटॅब (PiloTab): मॉलेक्युलरली व्हॅलीडेटेड आणि क्लिनिकली सिद्ध झाले आहे की ते अंतर्गत हिलिंगला जलद प्रमोट करते.
  • काँस्टीटॅब (ConsteTab): या गोळ्यांमुळे काँस्टीपेशन पासून मुक्ती मिळते, शौचाच्या (बॉवेल मुव्हमेंट) दरम्यान होणारी अस्वस्थता कमी होते आणि स्ट्रेन टळते.

फिशरकिट (Fissurekit) कसे वापरावे?

पाइलोस्प्रे (PiloSpray):

1. वापरण्यापूर्वी चांगले हलवा.

2. गुदद्वारासंबंधी (एनल) रिजनमध्ये प्रभावित झालेल्या फिशर कट वर 5-8 सेमी अंतरावरून 2-4 सेकंदांसाठी स्प्रे करा.

3. दिवसातून 3 - 4 वेळा किंवा गरजेनुसार, फिशरच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार, शक्यतो शौचास जाण्यापूर्वी (बॉवेल मुव्हमेन्टपूर्वी) आणि नंतर आणि झोपताना स्प्रे करा.

वापराच्या पद्धती:

खालीलपैकी कोणत्याही स्थितीमध्ये गुदद्वारासंबंधी (एनल) रिजनमधील प्रभावित भागावर बाहेरून स्प्रे करा:

  • स्क्वॅाटिंग: बटक पसरवा आणि स्प्रे करा.
  • उभे राहून: एका पायावर उभे राहा, दुसरा पाय आधार घेउन उचला, बटक पसरवा आणि स्प्रे करा.
  • आडवे झोपून: तुमच्या कुशीवर झोपा, एक पाय वर करा, बटक पसरवा आणि स्प्रे करा.

ऍनोऍक क्रीम:

वापराच्या पद्धती:

  • गुदद्वार आणि आजूबाजूचा भाग हलक्या हाताने स्वच्छ धुवा आणि मऊ कापडाने कोरडा करून घ्या.
  • क्रीम लावायच्या आधी हात स्वच्छ धुवून घ्या.
  • प्रभावित भागावर थोड्या प्रमाणात ऍनोऍक क्रीम लावा.
  • दिवसातून एक वेळा लावा: रात्री झोपायला जाण्यापूर्वी.

पाइलोटॅब टॅब्लेट्स (PiloTab):

  • डोस: जेवणानंतर 1 गोळी पाण्यासोबत घ्या, सकाळी एकदा आणि रात्री एकदा.

काँस्टीटॅब टॅब्लेट्स (ConsteTab):

  • डोस: कॉंस्टीपेशनच्या तीव्रतेनुसार, रात्रीच्या जेवणानंतर 1 किंवा 2 गोळ्या पाण्यासोबत घ्या.

फिशरकिट (FissureKit) कोर्स:

चांगल्या परिणामांसाठी 30 दिवसांचा कोर्स करण्याचा सल्ला दिला जातो. गुदद्वारासंबंधी (एनल) फिशरच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार, फिशरकिट (FissureKit) कोर्स तीन महिन्यांपर्यंत रिपीट करता येतो.

सर्वोत्तम परिणामांसाठी त्याचा 30 दिवसांचा कोर्स करण्याची शिफारस केली जाते आणि लाखो समाधानी रुग्ण त्याच्या प्रभावीतेवर विश्वास ठेवतात. फायबरयुक्त चांगला आहार, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम यामुळे औषधांसह बरे होण्यास मदत होते.

3. फिस्टुला किट: एनल फिस्टुला ट्रिटमेंट किट (FistulaKit Anal Fistula Treatment Kit )

 

गुदद्वारासंबंधी (एनल) भगंदर (फिस्टुला)च्या उपचारांसाठी अनेकदा सर्जरी करावी लागते, ज्यामध्ये फिस्टुलोटोमी तसेच काँप्लेक्स किंवा काँप्लीकेटेड प्रकरणांमध्ये एडव्हान्स प्रोसिजरचा समावेश असतो.फिस्टुलाकिट पोस्ट-सर्जरी एनल फिस्टुला केअर किट FistulaKit Post-Surgery Anal Fistula Care Kit पोस्ट-सर्जरी केअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, जलद रिकव्हरीमध्ये मदत करते आणि काँप्लीकेशनचा धोका कमी करते. ज्या प्रकरणांमध्ये सर्जरी त्वरित शक्य नाही, तेथे लक्षणे प्रभावीपणे मॅनेज करण्यासाठी फिस्टुलाकिटचा (Fistulakit) वापर केला जाऊ शकतो. यामध्ये चार प्रमुख घटक इंटिग्रेट केली जातात:

  •  ऍनोस्प्रे (AnoSpray): वेदना कमी करण्यासाठी, सूज (स्वेलिंग) कमी करण्यासाठी आणि जखमेच्या हिलिंगला चालना देण्यासाठी तयार केलेला पेटंट केलेला गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) स्प्रे.
  • टर्मोसिन प्लस (Turmocin Plus): टिश्यू दुरुस्तीला आणि इनफ्लमेशन कमी करण्यास मदत करण्यासाठी, त्याच्या एंटी-इनफ्लमेटरी गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी मॉलेक्युलरली व्हॅलीडेटेड कर्क्यूमिन टॅब्लेट.
  • ऍनोऍक-एच (Anoac-H): ही एक पेटंट मिळालेली गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) टॅब्लेट आहे जी इन्फेक्शन मॅनेजमेंट करण्यासाठी आणि एकूणच हिलिंगला सपोर्ट करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
  • कॉन्स्टॅकटॅब (ConstacTab): पेटंट केलेले लॅक्झॅटीव्ह काँस्टॅकटॅब हे शौचाच्या (बॉवेल मुव्हमेंट) नियमन करणे, काँस्टीपेशन रोखणे आणि डिफिकेशन दरम्यानचा ताण कमी करणे यासाठी आहे.

फिस्टुलाकिट (Fistulakit) कसे वापरावे?

ऍनोस्प्रे:

4. वापरण्यापूर्वी चांगले हलवा.

5. गुदद्वारासंबंधी (एनल) रिजनमध्ये प्रभावित झालेल्या जागेवर 5-8 सेमी अंतरावरून 2-4 सेकंदांसाठी स्प्रे करा.

6. दिवसातून 4-5 वेळा किंवा गरजेनुसार, फिशरच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार, शक्यतो शौचास जाण्यापूर्वी (बॉवेल मुव्हमेन्टपूर्वी) आणि नंतर आणि झोपेच्या वेळी वापरा.

वापराच्या पद्धती:

खालीलपैकी कोणत्याही स्थितीमध्ये गुदद्वार (एनल) रिजनमधील प्रभावित भागावर बाहेरून स्प्रे करा:

  • स्क्वॅाटिंग: बटक पसरवा आणि स्प्रे करा.
  • उभे राहून: एका पायावर उभे राहा, दुसरा पाय आधार घेउन उचला, बटक पसरवा आणि स्प्रे करा.
  • आडवे झोपून: तुमच्या कुशीवर झोपा, एक पाय वर करा, बटक पसरवा आणि स्प्रे करा.

टर्मोसिन प्लस टॅब्लेट्स (Turmocin Plus):

  • डोस: जेवणानंतर 1 गोळी पाण्यासोबत घ्या, सकाळी एकदा आणि रात्री एकदा.

ऍनोऍक-एच टॅब्लेट्स (Anoac-H):

  • डोस: जेवणानंतर 1 गोळी पाण्यासोबत घ्या, सकाळी एकदा आणि रात्री एकदा.

कॉन्स्टॅकटॅब टॅब्लेट्स (ConstacTab):

  • डोस: बद्धकोष्ठतेच्या तीव्रतेनुसार, रात्रीच्या जेवणानंतर पाण्यासोबत 1-2 गोळ्या घ्या.

ज्या प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया त्वरित शक्य नाही, तेथे लक्षणे प्रभावीपणे मॅनेज करण्यासाठी फिस्टुलाकिटचा (FistulaKit) वापर केला जाऊ शकतो.

प्रिव्हेंशन आणि रिकव्हरीसाठी लाइफस्टाइल टिप्स

आमच्या उत्पादनांसह लाइफस्टाइल मधील काही बदलांचे संयोजन केल्याने तुमच्या उपचारांचा वेग सुधारू शकतो आणि पुनरावृत्ती टाळता येते:

  • डाएट आणि हायड्रेशन: फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांसारखे उच्च फायबरयुक्त पदार्थ खा. कडक मल टाळण्यासाठी दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या.
  • हायजिन: संसर्ग टाळण्यासाठी, विशेषतः भगंदर (फिस्टुला) झाल्यास, गुदद्वारासंबंधी (एनल) योग्य स्वच्छता राखा. त्वचेला त्रास देणारे उग्र साबण वापरणे टाळा.
  • व्यायाम: बॉवेलची नियमितता सुधारण्यासाठी चालणे किंवा योगासारखे हलके व्यायाम करा. जड वस्तू उचलणे टाळा, ज्यामुळे मूळव्याध (पाइल्स) वाढू शकते.
  • ताण देणे (स्ट्रेनिंग) टाळा: गरज पडल्यास स्टूल सॉफ्टनर (मल मऊ करणारे) वापरा. शौचालयात जास्त वेळ घालवू नका, कारण त्यामुळे हेमोऱ्हॉइड्स वाढू शकतात.

हिलिंग हॅंड्स (Healing Hands) ची निवड का करावी?

मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) अस्वस्थ करणारे आणि कधीकधी कमजोर करणारे असू शकतात, परंतु योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांनी ते मॅनेज केले जाऊ शकतात. हीलिंग हैंड्स (Healing Hands) मधील आमची उत्पादने तुमच्या युनिक आरोग्य गरजांनुसार तयार केलेले प्रभावी उपाय आहेत आणि ती प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) काळजी सुनिश्चित करतात. हिलिंग हँड्स (Healing Hands) मध्ये, आम्ही गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) आरोग्यासाठी प्रभावी आणि नैसर्गिक उपाय प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत. तुम्ही आमच्यावर विश्वास का ठेवू शकता ते पहा:

  • नैसर्गिक फॉर्म्युलेशन्स (नॅचरल फॉर्म्युलेशन्स): सर्व उत्पादने प्लांट-बेस्ड घटकांपासून बनवलेली आहेत, आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त आहेत.
  • व्यापक दृष्टिकोन (काँप्रिहेन्सीव्ह अप्रोच): दीर्घकालीन आराम मिळावा यासाठी आम्ही या परिस्थितींमागची मूळ कारणे शोधतो.
  • क्लिनिकली व्हॅलीडेट केलेले आणि पेटंट मिळालेले उपाय/उपचार: आमची औषधे आणि किट्स संपूर्ण क्लिनिकल रिव्ह्यूनंतर तयार करण्यात आली आहेत आणि ती भारतातील पहिली पेटंट मिळालेली आणि मॉलेक्युलरली व्हॅलीडेट केलेली गुदद्वारासंबंधी (एनोरेक्टल) सोल्यूशन्स आहेत.
  • पेशंट-फर्स्ट तत्वज्ञान: आमची उत्पादने वापरण्यास सोपी आणि जलद परिणामांसाठी विकसित केलेली आहेत.
  • डॉक्टरांच्या सहकार्याने विकसित: ही औषधे भारतातील उत्तम प्रोक्टोलॉजी आणि जीआय हॉस्पिटल चेन, हीलिंग हँड्स (Healing Hands) क्लिनिक, आघाडीच्या डॉक्टरांच्या सहकार्याने विकसित केली आहेत.
  • डॉक्टरांनी शिफारस केलेले उपाय: प्रभावीपणा आणि सुरक्षिततेसाठी मेडिकल प्रोफेशनल्सचा विश्वास.

जाता जाता काही...

मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) हे आजार भयावह वाटू शकतात, परंतु योग्यवेळी काळजी आणि उपचारांनी त्यांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येते. हीलिंग हैंड्स (HEALING HANDS)येथे, आम्ही तुमच्या गरजांनुसार सुरक्षित, प्लांट-बेस्ड आणि प्रभावी उपाय उपलब्ध करून देतो.

शांतपणे त्रास सहन करत राहणे थांबवा आणि निरोगी, वेदनामुक्त जीवनाकडे पहिले पाऊल टाका. आमच्या उत्पादनांची श्रेणी एक्सप्लोर करा आणि मूळव्याध (पाइल्स), फिशर आणि भगंदर (फिस्टुला) यांच्यासाठी आमच्या समग्र आणि प्रगत उपचार पर्यायांबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. आत्ताच ऑर्डर करा आणि फरक अनुभवा!

Previous
પાઇલ્સ, ફિશર અને ફિસ્ટુલા વચ્ચેના તફાવતોને સમજવું
Next
बवासीर (पाइल्स), गुदा विदर (एनल फिशर) और भगंदर (फिस्टुला) के बीच फ़र्क को समझना